Trending

ashadhi ekadashi 2022 : आषाढीची लगबग; लाखो वारकरी पायी चालत पंढरपुरात, यंदा विक्रमी संख्येनं भाविक दाखल होणार

ashadhi ekadashi 2022 : आषाढीची लगबग; लाखो वारकरी पायी चालत पंढरपुरात, यंदा विक्रमी संख्येनं भाविक दाखल होणार

Ashadhi Wari 2022 : आषाढी यात्रेसाठी पंढरी सजली असून आज पालख्यांचं पंढरपुरात आगमन होणार आहे. कोरोनामुळे 2 वर्षांनंतर पायी चालत वारकरी पंढरपुरात दाखल होत असल्यानं वारकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. ashadhi ekadashi

ashadhi ekadashi

आषाढी एकादशीला अवघा एक दिवस बाकी आहे. पंढरपूरच्या जवळ येताच वारकऱ्यांना विठुरायाच्या भेटीची आस लागते आणि त्यांची पावलं पंढरपुराकडे ओढली जाऊ लागतात. आज पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. आषाढी यात्रेसाठी पंढरी सजली असून आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींचं पंढरपुरात आगमन होणार आहे. कोरोनामुळे 2 वर्षांनंतर पायी चालत वारकरी पंढरपुरात दाखल होत असल्यानं वारकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. ashadhi ekadashi

दोन वर्षानंतर होत असलेली आषाढी यात्रा विक्रमी होत असून काल नवमीपर्यंत शहरात जवळपास 7 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले होते. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या निवासाचा प्रश्न कायमच गंभीर असतो. मात्र, काही वर्षांपासून प्रशासनाने चंद्रभागेशेजारी असणाऱ्या 65 एकर जागेवर भक्तिसागर हे निवास क्षेत्र विकसित केले आहे. यंदा रेल्वेच्या ताब्यात असलेले 40 एकराचे क्षेत्र देखील प्रशासनाला मिळाल्याने यंदा 105 एकर जागेत तब्बल 5 लाख भाविकांच्या मोफत निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button