petrol diesel prices महाराष्ट्रात पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त: राज्य सरकारने व्हॅटमध्ये कपात केली, डिझेलही 3 रुपयांनी कमी
petrol diesel prices महाराष्ट्रात पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त: राज्य सरकारने व्हॅटमध्ये कपात केली, डिझेलही 3 रुपयांनी कमी
महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देत पेट्रोल 5 रुपयांनी आणि डिझेल 3 रुपयांनी स्वस्त केले आहे. राज्य सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. याआधी मे महिन्यातही महाराष्ट्र सरकारने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये प्रति लिटर २.०८ रुपये आणि डिझेलवर १.४४ रुपयांची कपात केली होती petrol diesel prices.

व्हॅटमधून कमाई करण्यात महाराष्ट्र सरकार आघाडीवर आहे
व्हॅटमधून कमाईच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्य सरकारने 2021-22 मध्ये व्हॅटद्वारे 34,002 कोटी रुपये कमावले. यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो, त्याने 26,333 कोटी रुपयांची कमाई केली
मुंबई : राज्यात पेट्रोल पाच रुपये तर डिझेल प्रतिलिटर तीन रुपये प्रमाणे कपात करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे. या कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर आता 6 हजार कोटींचा भार पडणार आहे petrol diesel prices.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज बैठक झाली. त्यात विविध विषयांवर अनेक निर्णय घेतले. त्यानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महागाई कमी करण्यासाठी पेट्रोल व डिझेलचे दर कमी करत आहे. पेट्रोल प्रतिलिटर पाच रुपये तर डिझेल तीन रुपयांनी कमी करत आहे, त्याचबरोबर नियमित कर्डफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे petrol diesel prices.