Motivational

आयुष्यातील हार (motivational story) हे पण वाचा:

motivational story

” मी जगदीश पाटील. मी रिटायर्ड क्लास वन आँफिसर आहे. ही आमची पहिलीच फाँरेन टूर आहे” बँकाँकच्या हाँटेलमध्ये मी सगळ्या ग्रुपला माझी ओळख करुन दिली. (motivational story)

motivational story

“साहेबांनी त्यांची अपूरी ओळख आपल्याला करुन दिलीये.” आमचा ग्रुप लिडर सर्वांना सांगू लागला. “तुम्हाला कल्पना नसेल पण साहेबांचे आपल्या मुख्यमंत्र्यांशी खुप जवळचे संबंध आहेत. आमदार, खासदारांसोबत तर त्यांची रोजची बैठक असते” (motivational story

मी मनातून खुष झालो पण मी तसं चेहऱ्यावर दाखवलं नाहीं

सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मी मनातून खुष झालो पण मी तसं चेहऱ्यावर दाखवलं नाहीं. हळूहळू सगळे आपला परीचय करुन देऊ लागले. बऱ्याच जणांची ही पहिलीच विदेशवारी होती तर काही जणांची दुसरी किंवा तिसरी. सर्वात शेवटी एक साधारण कपडे घातलेला एक माणूस उभा राहिला. त्यांच्या कपड्यांमुळे म्हणा किंवा सगळ्यांना जेवणाचे वेध लागले होते त्यामुळे म्हणा कुणी त्याला गांभीर्याने घेण्याच्या मुडमध्ये नव्हतं.

“मी सदानंद पाठक आणि ही माझी पत्नी मीनाक्षी पाठक. मी एका शैक्षणिक संस्थेत क्लार्क म्हणून काम करतो. आमची ही नववी फाँरेन टूर आहे” त्या हाँलमध्ये एकदम शांतता पसरली.मला तर आश्चर्याचा धक्काच बसला.

“आतापर्यंत आम्ही भुतान, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, हाँगकाँग, जपान या देशात जाऊन आलोय. पुढील वर्षी युरोप टूरला जायचा विचार करतोय” (motivational story)

अजूनही लोक धक्क्यातून बाहेर आले नव्हते. एका मामुली कारकुंड्याने इतक्या फाँरेन टुर्स कराव्या हे कुणाच्या पचनी पडत नव्हतं.

“पाठक तुम्ही एकटे गेले होतात की सहकुटूंब?” मी विचारल

” सहपत्नीक!तसं मुलांनाही तीनचार देशात घेऊन गेलो होतो पण त्यांच्या शिक्षण आणि करीयरमुळे सगळ्या देशात नेता आलं नाही”

” पाठक शैक्षणिक संस्थेत चांगला हात मारलेला दिसतोय तुम्ही” मी म्हंटलो तसा एकच हशा पिकला. पण पाठक गंभीर होता.

” अहो साहेब जवळजवळ सगळ्या शैक्षणिक संस्था राजकारण्यांच्या हातात असतांना एक मामुली कारकून काय हात मारणार आहे?”

सगळे शांत झाले.

“आम्हांला दोघांनाही प्रवास आणि पर्यटनाची आवड” पाठक पुढे बोलू लागला “जगप्रवास हे आमचं ध्येय होतं. पण कमाई तर तेवढी नव्हती. बचत हा एकमेव मार्ग होता तो आम्ही अवलंबला…..”

तेवढ्यात जेवण तयार झाल्याची बातमी घेऊन एक माणूस आला. सगळे उठले. पण मी पाठकला सोडणार नव्हत़ो. मी त्याला म्हंणालो.

पाठक तुमच्याशी सविस्तर बोलायचं होतं”

“जेवण झाल्यावर या ना साहेब रुममध्ये. या, छान गप्पा मारु”

ते सगळे जेवायला गेले मी मात्र रुमकडे पळालो. दोन पेग मारल्याशिवाय मला झोप आली नसती. जेवण झाल्यानंतर मी सौ. ला घेऊन पाठकच्या रुममध्ये गेलो.

“पाठक मला उत्सुकता आहे की हे सगळं तुम्ही कसं जमवलंत. इतक्या फाँरेन टुर्स, त्याही कमी पगारात!” मी विचारलं.

“सर विशेष काही नाही आम्ही आमची लाईफस्टाईल फार साधी ठेवली. फालतू खर्च करायचा नाही हे ठरवून टाकलं. आमच्याकडे आजही टिव्ही, अँड्रॉइड मोबाईल, होम थिएटर असं काहीही नाही. टू व्हिलर आता मुलानं घेतली तीही अगदीच गरज होती म्हणून. मी, माझ्या बायकोनं आतापर्यंत सगळं आयुष्य सायकलवर काढलं. बायको चांगली सुगरण असल्याने कधी हाँटेलिंग केलं नाही. हाँटेलचे सर्व पदार्थ ती घरीच करते”

“याचा अर्थ तुम्ही आयुष्यात एंजाँयमेंट काहीच केली नाही. अहो त्या वहिनींनाही जीव आहे. कधीतरी स्वयंपाकाचा कंटाळा त्यांनाही येतच असणार ना?”

पाठक हसला.

“साहेब एंजाँयमेंटचा अर्थ चमचमीत नाँनव्हेज खाणं, दारु पिणं, चारीत्र्यहीन पात्रांच्या आणि सासूसुनांच्या कारस्थानांच्या सिरीयल्स पहाणं हा असेल तर तो आम्हांला अमान्य आहे. चांगली पुस्तकं वाचणं, चांगलं संगीत ऐकणं, निसर्गात फिरणं, फुलांचं, पक्ष्यांचं निरीक्षण करणं, प्रवास करणं, प्रवासात भेटणाऱ्या व्यक्तींशी संबंध जुळवणं, त्यांच्या संस्कृतींचा अभ्यास करणं यातही एक पाँझिटिव्ह एंजाँयमेंट आहे असं तुम्हाला नाही वाटत? आता राहीला प्रश्न बायकोच्या स्वयंपाकाच्या कंटाळ्याचा, तर तुम्हाला सांगतो साहेब आमच्या घरातला प्रत्येकजण उत्कृष्ट स्वयंपाकी आहे त्यामुळे आम्ही आलटून पालटून स्वयंपाक करतो. स्त्री पुरुष समानता आमच्या घरात नेहमीच राहीली आहे.” (motivational story)

बापरे हे काहीतरी वेगळंच प्रकरण होतं. मी विषय बदलत म्हंटलं “बरं ते जाऊ द्या. मुळ विषयाकडे येऊ या”

“हं तर बचतीबरोबरच अँडिशनल इन्कमसाठी मी दुकांनांचे, छोट्या फर्म्सचे अकाऊंट्स लिहायला सुरुवात केली. मिसेसने पोस्टाची एजन्सी घेतली. मुलं मोठी झाल्यावर मुलीने शिकवण्या घ्यायला तर मुलाने गँरेजवर काम करायला सुरुवात केली. कोणत्याही कामाची लाज बाळगायची नाही हे आम्ही मुलांच्या मनावर बिंबवलं होतं”

“पण मग मुलांची शिक्षणं व्यवस्थित झाली का?”

” मुलं जात्याच हुषार आणि सिन्सियर होती.स्काँलरशिप मिळवून त्यांनी शिक्षणं पुर्ण केली. मला फक्त परिक्षेचा फाँर्म भरण्यासाठी ती पैसे मागत.”

“आता काय करतात मुलं?”

“मुलगी साँफ्टवेअर इंजीनियर आहे. तिने एम.एस. केलंय अमेरिकेतून. सध्या बंगलोरला असते.तिचा नवराही इंजीनियर आहे. दोघांनी कंपनी सुरु केलीय. मस्त चाललंय तिचं. मुलगा नुकताच एम.डी. झालाय मेडिसीनमध्ये. सध्या एका हाँस्पिटलला प्रँक्टिस करतोय. लवकरच स्वतःचं हाँस्पिटल उभारायचा विचार करतोय”

मी चाट पडलो. मला माझी मुलं आठवली. मुलीने काँलेजमध्ये अनेक लफडी केली होती. लग्नाअगोदरच ती प्रेग्नंट राहीली होती. ते प्रकरण निपटतांना माझ्या नाकी नऊ आले होते. प्रचंड हुंडा देऊन मी तिचं लग्न लावून दिलं होतं, पण तिथेही ती व्यवस्थित रहात नव्हती. भांडणं करुन माहेरी निघून येणं सुरुच होतं. मुलाने तर नाकात दम आणला होता.काँलेजमध्ये असतांना मारामाऱ्या करणं, मुलींची छेड काढणं, गुटखा खाणं. दारू पिणं एवढेच त्याचे उद्योग होते. माझ्या ओळखींमुळे मी त्याच्या भानगडी निस्तरल्या होत्या. काँलेजमधून काढून मी त्याला बियरबार काढून दिला. आम्हांला न जुमानता एका टुकार मुलीशी त्याने लग्न केलं होतं. तिच्याशीही त्याचं पटत नव्हतं. दारु पिऊन तो तिला मारहाण करायचा. घरात रोज घडणाऱ्या महाभारताला कंटाळूनच आम्ही बँकाँकच्या टूरला आलो होतो. (motivational story)

“आमचा औषधाचाही खर्च नगण्य आहे” पाठकच्या बायकोच्या बोलण्यामुळे माझीतंद्री भंगली.

“सायकल चालवण्यामुळे किंवा कुठेही पायी जात असल्यामुळे आम्ही एकदम फिट आहोत. लोक आम्हांला कंजूष म्हणतात पण याचे फायदे त्यांना दिसत नाहीत. बघा औषधाची एक गोळी नाही लागली आम्हांला. तोही खर्च आमचा वाचला.”

मी माझ्या सुटलेल्या पोटाकडे पाहिलं मग बायकोकडे पाहिलं. आम्ही दोघांनीही वजनाची शंभरी पार केली होती. तुलनेत पाठक पतीपत्नी चाळीशीतले वाटत होते. पाठकची बायको तर अजुनही चवळीची शेंग वाटत होती.

“साहेब तुमच्याबद्दल सांगा ना काही!” पाठक बोलला.

“आमचं ठिकच आहे.औरंगाबादला या .तिथे आमचा मोठा बंगला आहे दोन कोटीचा. मुंबई, पुणे, नाशिक इथेही आमचे फ्लँटस् आहेत. गावी पाचशे एकर जमीन आहे. मुलगा बियरबार चालवतो. मुलगी पुण्यात दिलीय” मी थोडं मग्रुरीनेच सागितलं.

‌”अरे वा छान. आम्ही पण औरंगाबादमध्येच रहातो. आमचं घर मात्र छोटंसं आहे. पण काहो साहेब एवढी सगळी प्राँपर्टी फक्त पगारावर जमवली? की काही साईड बिझीनेसही आहे तुमचा?”

‌मी जोरात हसलो. हे सगळं मी भ्रष्टाचार करुन कमवलं होतं.दोन तीनदा मी पकडलाही गेलो होतो पण मंत्र्यांच्या क्रुपेने सहीसलामत सुटलो होतो.

“अहो पाठक समजून घ्या. एका सरकारी खात्यातला मी वरीष्ठ अधिकारी! सरकारी खात्यात काय चालतं हे तुम्हालाही माहीत आहे. मला म्हणूनच तर मला आश्चर्य वाटलं की साधारण नोकरी असूनही तुम्ही हे सर्व जमवलं कसं?”

‌” साहेब तुम्ही पैसा कमवण्यात आयुष्य घालवलं. मी आनंद मिळवण्यात. अर्थात पैसा कमवण्यातही आनंद मिळतोच की!”

‌पाठकने जणू माझ्या थोबाडीतच मारली होती. पण त्याने माझी शान कुठे पाहिली होती?

‌”घरी या एकदा पाठक. पैसा काय काय घडवू शकतो हे समजेल तुम्हांला”

‌पाठक निर्मळ हसला. मग म्हणाला.

‌”पैसेवाल्यांचे थाटच वेगळे असतात साहेब. आमच्या झोपडीला तुमचे चरणस्पर्श होऊ द्या. ते झाले की आम्हांलाही तुमच्याकडे यायला बरं वाटेल”

“हरकत नाही.येऊ आम्ही. बरं आता रजा घेतो.गुड नाईट”

‌आम्ही रुमवर परतलो पण मला झोप काही लागेना. कमी पैशातही अनेक गोष्टी करता येतात हे पाठकने मला दाखवून दिलं होतं. 

खरोखर पैशाच्या मागे लागून मी खरं आयुष्य जगलोच नव्हतो. व्यसनांमुळे आणि शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे माझं शरीर सगळ्या आजारांचं माहेरघर झालं होतं. अतिवजन, बी.पी. डायबेटीस, खराब लिव्हर, गुडघेदुखी, स्पाँडिलायटीस, निद्रानाश… कोणते आजार नव्हते मला? अजून साठी गाठली नव्हती तरी सत्तरीचा म्हातारा दिसत होतो. थकव्यामुळे मी बँकाँकचं साईटसिईंगही एंजॉय करु शकलो. (motivational story)

बँकाँकहून परतल्यावर काही दिवसांनी मला पाठकची आठवण झाली. मी त्याला फोन करुन रविवारी येत असल्याचं सांगितलं. त्याने त्याचा पत्ता दिला. फोनवर तरी त्याला आनंद झाल्याचं जाणवलं.

पाठकला इंप्रेस करण्यासाठी मी मुद्दाम माझी आलिशान कार घेऊन गेलो. रस्त्यावर पाठक आमची वाटच पहात होता. मी त्याच्या घरावर नजर टाकली.एक छोटंसं एकमजली घर होतं ते. माझा बंगला त्याच्या तिप्पट मोठा होता.

“या साहेब, या मँडम” पाठकने आमचं स्वागत करत गेट उघडलं. आत पाऊल टाकताच आतली छोटीशी बाग नजरेस पडली. फुलझाडांनी गच्च भरलेली.मुख्य दरवाजासमोर सुंदरशी रांगोळी काढली होती.आम्ही आत प्रवेश केला. पाठकच्या बायकोने समोर येऊन आमचं हसून स्वागत केलं. आत शिरताच जाणवलं ते स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण. हाँलमध्ये थोडंसं पण सुबक फर्निचर होतं.भिंतीवर दोनच पण सुरेख पेंटिंग्ज होती. टिपाँयवर आणि एका भिंतीच्या कोपऱ्यात ताज्या फुलांचे फ्लाँवरपाँटस् होते. शोकेस ट्राँफिजने भरलेलं होतं. (motivational story)

“बापरे इतक्या ट्राँफिज!कुणाच्या आहेत या?” माझ्या तोडातून नकळत शब्द निघून गेले.

‌”सगळ्यांच्याच! मुलीच्या गायन स्पर्धेच्या, मुलाच्या वक्तृत्व आणि नाट्य स्पर्धेच्या, सौ च्या रेसिपी स्पर्धेच्या आणि माझ्या बँडमिंटन स्पर्धेतल्या”

“वा छान” मी चांगलाच इंप्रेस झालो.

‌”या साहेब तुम्हाला घर दाखवतो. अर्थात तुमच्या बंगल्याच्या तुलनेत झोपडीच म्हणायला हवी

‌मी सहमत असल्याचं स्मित केलं. पण आम्ही जसजशी एकेक रुम पहायला लागलो तसतसा माझा गर्व नाहीसा होत गेला. एकुण एक खोली पाठक कुटूंबाच्या स्वच्छ चारित्र्याची, कल्पकतेची, रसिकतेची, कलात्मकतेची, आनंदी व्रुत्तीची, एकमेकांवरील प्रेमाची प्रतिबिंब होती. छोटंसं असूनही ते घर अप्रतिम होतं. (motivational story)

बैठकीत परत येऊन मी माझ्या घराचं चित्र डोळ्यासमोर उभं केलं आणि निराशेचं मळभ माझ्या मनावर दाटून आलं. एवढा मोठा बंगला महागड्या, आधुनिक पण अभिरुचीहीन वस्तूंनी सजला होता. पण त्यात प्रेम, संस्कार, संस्कृतीचा पुर्णपणे अभाव होता. मला जाणवलं, पैसा नसूनही पाठक माझ्यापेक्षा विचाराने, चारित्र्याने, कर्तृत्वाने नक्कीच श्रीमंत होता.

‌”घ्या साहेब” पाठकच्या बायकोने माझ्यासमोर शिरा-पोह्याची डिश ठेवली. त्यांच्या वासानेच माझी भुक खवळली. मी चमच्याने त्याचा घास घेतला आणि एका अप्रतिम चवीची नोंद माझ्या मनाने घेतली.

‌”वा अप्रतिम!” मी पाठककडे पहात म्हणालो.

‌”साहेब तुम्ही जेवणाचं नाही म्हणालात नाहीतर आम्ही एक वेगळाच मेनू आम्ही ठरवला होता”

‌”अशी सुरेख चव असेल तर जेवायला यावंच लागेल” मी पहिल्यांदाच कुणाची इतकी स्तुती करत होतो.

‌आमचा चहा झाल्यावर पाठकचा मुलगा आला. ओळख करुन दिल्यावर तो माझ्या आणि सौ.च्या पाया पडला.

‌”हाँस्पिटलचं काम कुठपर्यंत आलंय. तुझे वडिल मदत करणार असतील ना तुला!”

‌मी मुद्दामच तिरकस प्रश्न विचारला.

‌”बाबांची मदत घ्यायचीच कशाला काका? अहो आमच्यासाठी त्यांनी काय नाही केलं? आम्हाला एवढं शिकवलं, मोठं केलं. त्यांनी आणि आईने आपल्या कष्टाने शुन्यातून उभं केलेलं हे विश्व आम्ही लहानपणापासून पहातोय. अजून कीती अपेक्षा करायची आम्ही त्याच्याकडून? आणि उडू द्या ना आमच्या पंखांनी आम्हाला! त्यांची मदत घेतली तर आम्हांला कायमची रुखरुख लागेल आम्हांला की त्यांच्या मदतीमुळेच आम्ही मोठे झालो”

‌त्याच्या सडतोड पण उत्तराने मी गार पडलो. त्या उत्तरात आईवडिलांविषयी आदर होता. त्यांनी केलेल्या कष्टांची जाणीव होती. हे असे संस्कार मी मुलांना का देऊ नाही शकलो याचं मला दुःख झालं. दोन पिढ्या बसून खातील एवढी माया मी जमवली होती ती काय मुलांना निष्क्रिय, ऐतखाऊ बनवण्यासाठी? मला स्वतःचीच घ्रुणा वाटू लागली. (motivational story)

पाठक कुटूंबाचा निरोप घेऊन निघालो.पण मी दुःखाने जळत होतो. ज्याला मी माझं कर्तृत्व समजत होतो ते पाठक कुटूंबाने मातीमोल केलं होतं. मला माझ्या कुटूंबाची, संपत्तीची लाज वाटू लागली होती.

दिवस बदलत गेले. निवडणूका झाल्या. माझ्या ओळखीचे आमदार, खासदार पराभुत झाले. सरकार बदललं. पण मला काळजी नव्हती.कारण मी आता नोकरीत नव्हत.

‌एक दिवस सकाळीच दाराची बेल वाजली. मी दार उघडलं. बाहेर ४-५ सुटाबुटातील माणसं उभी होती.

‌”आम्ही इन्कमटँक्स डिपार्टमेंट कडून आलोय.”त्यातल्या एकाने कार्ड माझ्या हातात देत दिलं. मी गारठलो, माझे हातपाय थरथर कापू लागले.

‌”मी माझ्या वकिलाशी बोलू शकतो?” मी कापऱ्या आवाजात विचारलं.

‌” जरुर बोला! त्यांना दाखवण्यासाठी सगळी कागदपत्र आहेत आमच्याकडे

‌”अहो पण साहेब मी आता रिटायर झालोय”

‌”साहेब जरुरीपेक्षा जास्त संपत्ती जमवली की आपोआपच हितशत्रू तयार होतात. विरोधी पक्षांकडे तर तुमची कुंडलीच तयार असेल” तो स्मित करत म्हणाला. 

मला सगळा अंदाज आला. ते ऐकून मी सुन्न झालो. ‌दुपारी तीन वाजेपर्यंत बंगल्याची झडती सुरु होती. मुलगा आणि बायको निर्विकार नजरेने त्याकडे बघत होते. सुनेच्या चेहऱ्यावर कपटी हसू होतं. ‘आता भोगा आपल्या पापाची फळं’ अशाच त्यांच्या नजरा मला सांगत होत्या.

“चला साहेब” झडतीत सापडलेले बेहिशोबी ₹२५ लाख आणि दोन किलो सोन्याच्या चिप्स् दाखवत एक अधिकारी म्हणाला

‌”कुठे?”

‌”चौकशीसाठी आम्ही तुम्हांला ताब्यात घेत आहोत”

‌मी मुकाट्याने गाडीत जाऊन बसलो. ‌मला अचानक पाठकची आठवण आली.

‌”साहेब एक फोन लावू?” मी विचारलं.

‌”नो पाँलिटिकल इन्फ्लुएन्स”

‌”साहेब हा माणूस साधा कारकून आहे”

‌”ठिक आहे.स्पिकर आँन करा.

‌मी पाठकला फोन लावला

‌”हँलो पाठक मी पाटील बोलतोय! पाठक तुम्ही जिंकलात.मी हरलो”

‌”काय झालं साहेब?असं का बोलताय?”

‌”पाठक इन्कमटँक्सची धाड पडली आज बंगल्यावर! मी पकडला गेलो.

‌क्षणभर शांतता पसरली. मग पाठकचा आवाज आला.

‌”साहेब तुम्हाला सोडवण्याइतका मी मोठा माणूस नक्कीच नाही, पण मी तुमच्या सुटकेसाठी जरुर प्रार्थना करेन. जे गैरमार्गाचं धन होतं ते गेलं तर जाऊ द्या. तुम्हांला पेन्शन भरपूर असेल साहेब. तुमच्या एका महिन्याच्या पेन्शनमध्ये भारतातील अनेक कुटुंबं सहा महिने संसार करतात. सुटून आल्यावर साधं आयुष्य जगा. गोरगरीबांना मदत करा. घेण्यापेक्षा देण्यात खुप आनंद असतो साहेब, काही काळजी करु नका. सगळं व्यवस्थित होईल” (motivational story)

‌का कुणास ठाऊक पाठकशी बोलल्यानंतर मला हलकं वाटू लागलं.येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत मला आली.सगळी संपत्ती जप्त झाली तरी चालेल.नाहीतरी ज्यांच्यासाठी कमवली त्यांना कोणती माझी किंमत होती?साधी सहानुभूती सुध्दा त्यांनी मला दाखवली नव्हती.

‌पाठकच्या रुपात एक खरा हितचिंतक मला भेटला होता.पण तो अगोदर का भेटला नाही याची खंत मला वाटून गेली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button