pm kisan: पीएम किसान या तारखेला जमा होणार १२व्या हप्त्याचे २००० हजार रुपये
pm kisan : पीएम किसान या तारखेला जमा होणार १२व्या हप्त्याचे २००० हजार रुपये

बऱ्याच काळानंतर PM किसान सन्मान निधीच्या बाबतीत एक मोठं अपडेट समोर येत आहे. ३१ मे रोजी ११व्या हप्त्याचे रुपये पीएम मोदींच्या वतीने शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. त्यानंतर केवायसी करण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली. पण आता खात्यात १२वा हप्ता कधी येणार याची माहिती समोर येत आहे pm kisan.
शेतकरी १२व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या हप्त्याचे पैसे ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान हस्तांतरित होणे अपेक्षित आहे. कृषी मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारकडून १ सप्टेंबर रोजी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर १२वा हप्ता जमा करणे अपेक्षित आहे pm kisan.
सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ जुलैपर्यंत वाढवली आहे. ३१ जुलैनंतर ई-केवायसीची तारीख वाढवली जाणार नाही, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, ३१ जुलैपर्यंत ई-केवायसी करणार्यांनाच भविष्यात पीएम किसान निधीचा लाभ मिळेल. तुम्ही अद्याप ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा