AgricultureNews

Land Record शेत जमिनीचा नकाशा मोफत मोबाईलवर डाऊनलोड करा

  Land Record शेत जमिनीचा नकाशा मोफत मोबाईलवर डाऊनलोड करा

land record

शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं. आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.     Land Record

जमिनीचा नकाशा कसा पाहायचा?

जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला खाली दिलेल्या वेब साईट वर जायचं आहे.

या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य, कॅटेगरी मध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल, तर रुरल हा पर्याय निवडायचा आहे आणि शहरी भागात असाल, तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे.

त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी village map यावर क्लिक करायचं आहे.     Land Record

आता जमिनीचा नकाशा कशा काढायचा ते पाहूया.

या पेजवर search by plot number या नावानं एक रकाना दिलेला आहे.

इथं तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होतो.     Land Record 

होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून आणि मग वजाबाकीचं (-) बटण दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकता.

आता डावीकडे plot info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.     Land Record

एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती इथं दिलेली असते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button