agri : एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा शेतकऱ्यांना मिळणार ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
agri : एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा शेतकऱ्यांना मिळणार ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.करोना प्रतिबंधक नियमांच्या अधीन राहून या निर्णयाची ग्रामसभा स्तरावर जनजागृती करून प्रभावीपणे अंमलबजावणी करा. अर्थसहाय्य बाबत शेतकऱ्यांच्या समस्यांची सन्मानाने सोडवणूक करून मागील वर्षाच्या तुलनेत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वाढवून ३० जूनच्या आत शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप करा, असे निर्देश महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँक शाखा अधिकाऱ्यांना दिले. agri
.jpg)
Crop Loan सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सोमवारी तालुक्यातील खरीप पीककर्ज बाबत आढावा बैठक झाली. या वेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या व पीककर्ज संदर्भात अधिकाऱ्यांना निर्देशित केले. या वेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी डॉ. अशोक दांडगे, सहाय्यक दुय्यम निबंधक ज्ञानेश्वर मातेरे यांच्यासह तालुक्यातील विविध बँकेचे शाखा अधिकारी उपस्थित होते. agri
बँकांनी गावात ग्रामसभा घेऊन पीककर्ज, शैक्षणिक कर्ज अशा विविध योजनांची माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सरकारच्या तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्जाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे, राज्य सरकारने तीन लाख रुपयांपर्यंत हमी घेतलेली आहे. याचे व्याज सरकार भरणार आहे, त्यामुळे बँकांनी याची चिंता करू नये. agri